जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये विद्यापीठाने जगात ५६६ वे स्थान मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विशेष कौतुक करण्यात आले यासाठी विद्यापीठात विशेष कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
पुणे: यंदा जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने जगात ५६६ वे स्थान मिळविले आहे. तसेच विद्यापीठास भारतातील एकूण सार्वजनिक विद्यापीठांमध्ये दुसरे मानांकन मिळाले आहे आणि महाराष्ट्रातील विद्यापीठांमध्ये पहिले मानांकन मिळाले आहे. त्या विषयी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यापीठाचे कुलगुरू, प्र – कुलगुरू, कुलसचिव यांचे तसेच सर्व पदाधिकारी, शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व सर्व सहभागी घटकांचे अभिनंदन केले. त्याचबरोबर जगभरातील पहिल्या पाचशे विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांचा नंबर येण्याचे आपले उद्दिष्ट असून, त्या दिशेने यशस्वी वाटचाल करण्यासाठी व सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पाचशे च्या आतील क्रमवारीमध्ये येण्यासाठी शासन स्तरावरील सर्व मदत करण्याचे आश्वासन इरावती कर्वे सामाजिक शास्त्र संकुलातील सभागृहातील आयोजित विद्यापीठाच्या कौतुक सोहळ्यामध्ये राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिले.

टीका झाल्यानंतर कौतुक सोहळ्याचा दुसऱ्या टप्प्याचे आयोजन?
जागतिक पातळीवरील क्यूएस वर्ल्ड रँकिंगमध्ये विद्यापीठाने जगात ५६६ वे स्थान मिळविल्याबद्दल महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे विशेष कौतुक करण्यात आले यासाठी विद्यापीठात विशेष कौतुक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.परंतु या सोहळ्यात शिक्षकेत्तर व इतर कर्मचारी यांना आमंत्रण देण्यात आले नव्हते यावर विविध विद्यार्थी संघटनांनी तसेच शिक्षक संघटनांनी आवाज उठवला व प्रमुख प्रसिद्ध वृत्तपत्रांतून यासंदर्भात टीकेची झोड उठवण्यात आली याची विद्यापीठ प्रशासनाने दखल घेतली असून या विद्यापीठातील शिक्षकेतर कर्मचारी व इतर संबंधित घटकांसाठी लवकरच दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यात येणार आहे. अशी माहिती विद्यापीठाने प्रसिद्धीस दिलेल्या नोटमध्ये नमुद करण्यात आली आहे.
या सोहळ्यामध्ये मंत्री महोदयांनी विद्यापीठातील सर्व पदाधिकारी, प्राध्यापक, शिक्षकेतर सेवक व सर्व सहभागी घटकांचे कौतुक केले आणि भेटवस्तू देत विद्यापीठाच्या पुढील वाटचालीसाठी प्रोत्साहनही दिले. यावेळी त्यांनी विद्यापीठाच्या विविध संशोधनासाठी सीएसआर फ़ंडातून निधी उपलब्ध करून देण्याचेही आश्वासन दिले. तसेच राज्यातील प्राध्यापक भरतीची शासन मान्यताही लवकरच पूर्णत्वास येणार असून भरतीची प्रक्रिया लवकरच सुरु करण्यात येईल असेही सांगितले.
सदर कौतुक सोहळ्यामध्ये विद्यापीठाच्या सल्लागार समितीचे सदस्य राजेश पांडे ,विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य, अधिसभा सदस्य, विद्यापरिषद सदस्य, संविधानिक अधिकारी , विद्यापीठाच्या प्रशासकीय व शैक्षणिक विभागांचे विभागप्रमुख, शिक्षक सहभागी झाले होते विद्यापीठाचे शिक्षकेतर कर्मचारी व इतर संबंधित घटकांसाठी लवकरच दुसऱ्या टप्प्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
कुलगुरू प्रा. डॉ. सुरेश गोसावी यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तर विद्यावानीचे संचालक श्रीदत्त गायकवाड यांनी सूत्रसंचालन केले. कुलसचिव प्रा. डॉ. ज्योती भाकरे यांनी आभार मानले.

















