राज्यात प्राध्यापक भरती प्रक्रियेत गोंधळ : नव्या जीआरमुळे नव्या आणि अनुभवी उमेदवारांवर संकट; मुलाखतीसाठी ५० पेक्षा जास्त ATR गुण आवश्यक
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तांत्रिक शिक्षण विभागाने ६ ऑक्टोबर २०२५ रोजी जारी केलेल्या नव्या शासन निर्णयामुळे (GR) शैक्षणिक आणि विद्यापीठ क्षेत्रात मोठी चर्चा आणि नाराजी पसरली आहे. राज्यातील सार्वजनिक (अकृषी) विद्यापीठांमधील प्राध्यापकांच्या भरती प्रक्रियेसाठी तयार करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे अनेक अनुभवी तसेच नवीन उमेदवार भरती प्रक्रियेबाहेर पडणार असून बहुसंख्य उमेदवारांवर संकट येण्याची शक्यता आहे.
शासन निर्णय क्र. संकीर्ण-२०२५/ई-८६०४२१/निशी-१ नुसार, शासनाने शिक्षकांच्या नियुक्तीसाठी अधिक पारदर्शक, वस्तुनिष्ठ आणि न्याय्य प्रक्रिया लागू करण्यासाठी नवीन गुणाधारित पद्धतीचा अवलंब केला आहे. मात्र या निर्णयामुळे पूर्वीच्या प्रणालीप्रमाणे पात्र ठरलेले अनेक उमेदवार अनवधानाने वगळले जाणार आहेत. राज्यपाल कार्यालयाच्या निर्देशांनुसार प्रक्रिया अधिक पारदर्शक आणि वस्तुनिष्ठ करण्यासाठी ही सुधारित पद्धत लागू करण्यात आली आहे. ही पद्धत आता सद्य आणि भावी सर्व भरती प्रक्रियांना लागू राहील.
“ही भरती प्रक्रिया पारदर्शक म्हणवली जात असली, तरी प्रत्यक्षात ती अनुभवी शिक्षकांसाठी अन्यायकारक ठरत आहे. नव्या नियमांमुळे आम्हाला आपल्या मेहनतीचे आणि अनुभवाचे मूल्य मिळत नाही. राष्ट्रीय संस्थांतून शिक्षण घेतलेल्यांना प्राधान्य देणे म्हणजे राज्यातील शिक्षकांची किंमत कमी करणे आहे.
– उमेदवार, प्राध्यापक भरती
गुणवत्तेचा आग्रह योग्य आहे, पण राज्यातील प्राध्यापकांचा अनुभव आणि योगदान दुर्लक्षित करणे चुकीचे आहे. ही भरती प्रक्रिया न्याय्य करण्यासाठी शासनाने तातडीने चर्चा घ्यावी. अन्यथा राज्यभर आंदोलन उभे राहील.
– अक्षय कांबळे, राज्य उपाध्यक्ष, एनएसयुआई, महाराष्ट्र राज्य
गुणांचे असमान वाटप : मुलाखतीसाठी ५० पेक्षा जास्त ATR गुण आवश्यक
या नव्या पद्धतीनुसार गुणवाटप पुढीलप्रमाणे करण्यात आले आहे :
- ७५% — शैक्षणिक, अध्यापन व संशोधन योग्यता (ATR)
- २५% — मुलाखतीतील कामगिरीसाठी
- उमेदवारांना मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी किमान ५० पेक्षा जास्त ATR गुण मिळवणे आवश्यक आहे. तसेच, पदवी कोणत्या विद्यापीठातून मिळाली आहे यावरही आता गुण दिले जाणार आहेत.
- IIT, NIT, IISER, IIM किंवा शीर्ष २०० क्रमांकात असलेल्या परदेशी विद्यापीठांमधून पदवी प्राप्त केलेल्या उमेदवारांना अधिक गुण दिले जातील.
- फक्त Web of Science, Scopus किंवा SciFinder मध्ये सूचीबद्ध संशोधन लेखांनाच मान्यता मिळणार आहे.
नेट व सेट पात्रता असूनही उमेदवार मुलाखत प्रक्रियेला मुकणार
शासनाचा दावा आहे की ही प्रक्रिया अधिक पारदर्शक बनेल, मात्र अनेक उमेदवार आणि शिक्षक याला अतिशय कठोर व भेदभावपूर्ण मानत आहेत. राज्य आणि खाजगी विद्यापीठांतील अनुभवी शिक्षकांची तुलना राष्ट्रीय दर्जाच्या संस्थांतील उमेदवारांशी केली जात आहे, तसेच नेट व सेट पात्रता असूनही अनेक उमेदवार फक्त कमी गुण मिळाल्यामुळे मुलाखत प्रक्रियेला मुकणार आहेत.
वर्षानुवर्षे मान्यताप्राप्त महाविद्यालयांत अध्यापन केले, पण नव्या जीआर नुसार नव्या व अनुभवी उमेदवारांचे अनुभव आणि संशोधन कार्य नगण्य ठरत आहे. असमान गुणांकनामुळे पात्र असूनही या उमेदवारांना मुलाखतीला मुकावे लागणार आहे.”
– राहुल ससाणे, अध्यक्ष, विद्यापीठ संघर्ष कृती समिति, महाराष्ट्र राज्य
नवीन भरती नियम लागू झाल्याने नवोदित आणि अनुभवी दोन्ही वर्गातील उमेदवार असमान गुणप्रणालीमुळे अनिश्चित भविष्याच्या स्थितीत आहेत. गुणवत्ता आणि जबाबदारी वाढविण्याच्या उद्देशाने घेतलेला हा निर्णय योग्य असला, तरी सर्व उमेदवारांना यात सामावून घेतले पाहिजे, जेणेकरून जुन्या प्रणालीप्रमाणे अर्ज केलेल्यांवर अन्याय होऊ नये.”
– प्रा. डॉ. हर्ष गायकवाड, सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
मुलाखतीसाठी पात्र व निवडीसाठी गुणांकन तपशील.
A. शैक्षणिक नोंदी 55 पदवी कोणत्या विद्यापीठातून आहे यावर आधारित गुण (IIT, NIT, IISER, IIM आणि QS टॉप 200 विद्यापीठांना जास्त गुण).
पदवी (UG) 11 80% व अधिक = 11, 60–79% = 9, 55–59% = 7, 45–54% = 4
पदव्युत्तर (PG) 18 80% व अधिक = 18, 60–79% = 16, 55–59% = 14
एम.फिल. 5 60% व अधिक = 5, 55–59% = 3
पीएच.डी. 20 पीएच.डी. = 20 गुण (एम.फिल.+ पीएच.डी. = कमाल 20)
JRF / NET / SET 6 JRF = 6, NET = 4, SET = 3
B. अध्यापन अनुभव 5 प्रति वर्ष 1 गुण (एक वर्षापेक्षा कमी असल्यास प्रमाणानुसार).
C. संशोधन व नवोपक्रम 15
संशोधन प्रकाशने 6 प्रत्येक संशोधन पेपरसाठी 1 गुण (फक्त Scopus, Web of Science, SciFinder मध्ये सूचीबद्ध).
पुस्तके / IPR 6 लेखक पुस्तक = 2, संपादित/प्रकरण = 1, IPR मंजूर = 2
पुरस्कार 3 राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय = 3, राज्यस्तरीय = 2
- एकूण (A + B + C) शैक्षणिक + अध्यापन + संशोधन 75 गुण
- मुलाखत विषय ज्ञान, ICT कौशल्य, NEP जागरूकता 25 गुण
- मुलाखतीसाठी पात्र होण्यासाठी किमान 50 ATR गुण आवश्य














Leave a Reply