युजीसीतर्फे देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचाही समावेश

युजीसीतर्फे देशातील २२ बनावट विद्यापीठांची यादी जाहीर; महाराष्ट्रातील एका विद्यापीठाचाही समावेश

नवी दिल्ली: उच्च शिक्षणाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या २२ बनावट विद्यापीठांवर विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) कारवाई केली आहे. या विद्यापीठांची अधिकृत यादी जाहीर करण्यात आली असून, त्यात महाराष्ट्रातील नागपूर येथील राजा अरेबिक युनिव्हर्सिटीचा देखील समावेश आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशात सर्वाधिक अशा बनावट विद्यापीठांचा शोध लागला आहे. यूजीसीने नमूद केले आहे की, ही विद्यापीठे कोणत्याही प्रकारची मान्यता नसताना ‘विद्यापीठ’ हा शब्द वापरून विद्यार्थ्यांना बनावट पदव्या देत आहेत.विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी यूजीसी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा बोगस विद्यापीठांची अद्ययावत यादी प्रसिद्ध करते. या संस्थांवर कारवाई करण्याचे निर्देश राज्य सरकारांना देण्यात आले आहेत; मात्र, काही राज्यांकडून अद्याप ठोस कारवाई झालेली नाही, असे यूजीसीने स्पष्ट केले आहे. कोणत्याही संस्थेत प्रवेश घेण्यापूर्वी त्या संस्थेला यूजीसीकडून मान्यता आहे की नाही, हे नक्की तपासावे असे आयोगाने विद्यार्थ्यांना आवाहन केले आहे. 

राज्य निहाय बनावट विद्यापीठांची संख्या दिल्लीतील बनावट विद्यापीठे (१०)

उत्तर प्रदेशातील बनावट विद्यापीठे (४):

केरळ (२):

पश्चिम बंगाल (२):

आंध्र प्रदेश (२):

पुदुच्चेरी (१):

महाराष्ट्र (१):

 

यूजीसी कायदा १९५६ काय सांगतो?

यूजीसी कायदा १९५६ नुसार, कोणत्याही शैक्षणिक संस्थेला “विद्यापीठ” हा दर्जा केवळ आयोग किंवा केंद्र सरकारकडूनच मिळू शकतो. मात्र, अनेक संस्था हा नियम धाब्यावर बसवून काम करत असल्याचे समोर आले आहे. दिल्लीतील १० आणि उत्तर प्रदेशातील ४ बनावट विद्यापीठांसह केरल, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, पुदुच्चेरी आणि महाराष्ट्रातील काही संस्थांचा या यादीत समावेश आहे

यूजीसीकडून जाहीर २२ बनावट विद्यापीठांची यादी

दिल्लीतील बनावट विद्यापीठे (१०):

1. ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक अँड फिजिकल हेल्थ सायन्सेस (AIIPHS) युनिव्हर्सिटी

2. कमर्शियल युनिव्हर्सिटी लिमिटेड

3. युनायटेड नेशन्स युनिव्हर्सिटी

4. वोकेशनल युनिव्हर्सिटी

5. ए.डी.आर. सेंट्रिक ज्युरिडिकल युनिव्हर्सिटी

6. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स अँड इंजिनियरिंग

7. विश्वकर्मा ओपन युनिव्हर्सिटी फॉर सेल्फ एम्प्लॉयमेंट

8. स्पिरिच्युअल युनिव्हर्सिटी

9. डब्ल्यूपीयूएन (WPUN) युनिव्हर्सिटी

10. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अँड इंजिनियरिंग

उत्तर प्रदेशातील बनावट विद्यापीठे (४):

11. गांधी हिंदी विद्यापीठ, प्रयागराज

12. नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ इलेक्ट्रो कॉम्प्लेक्स होमिओपॅथी, कानपूर

13. नेताजी सुभाषचंद्र बोस मुक्त विद्यापीठ, अलीगढ

14. भारतीय शिक्षा परिषद, लखनऊ

केरळ (२):

15. सेंट जॉन युनिव्हर्सिटी, किशानत्तम

16. इंटरनॅशनल इस्लामिक युनिव्हर्सिटी

पश्चिम बंगाल (२):

17. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन, कोलकाता

18. इन्स्टिट्यूट ऑफ अल्टरनेटिव मेडिसिन अँड रिसर्च, कोलकाता

आंध्र प्रदेश (२):

19. क्राइस्ट न्यू टेस्टामेंट डीम्ड युनिव्हर्सिटी

20. बायबल ओपन युनिव्हर्सिटी ऑफ इंडिया

पुदुच्चेरी (१):

21. श्री बोधी अकॅडमी ऑफ हायर एज्युकेशन

महाराष्ट्र (१):

22. राजा अरेबिक युनिव्हर्सिटी, नागपूर

See also  विद्यार्थ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना; NTF पोर्टलवर माहिती भरणे बंधनकारक; शिक्षण संचालनालयाचे विद्यापीठांना निर्देश

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!