‘एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स’ तात्काळ बंद करा आणि विद्यार्थ्यांची आर्थिक लुट थांबवा
पी.एचडी 2 क्रेडिट कोर्ससह सर्व क्रेडिट कोर्स ऐच्छिक करण्याची मागणी
विविध राजकीय विद्यार्थी संघटनांनी व आंदोलकांची मागणी
पुणे : येथील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मध्ये आज विविध राजकीय विद्यार्थी संघटनांच्या वतीने “एक्स्ट्रा क्रेडिट कोर्स” बंद करण्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन विद्यापीठातील विविध शैक्षणिक व प्रशासकीय प्रश्नांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आले होते. या आंदोलनात एनएसयुआई, युवा सेना, महाराष्ट्र विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्व संघटनांनी एकमुखाने विद्यापीठ प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली व जोरदार घोषणाबाजी करत विद्यापीठाचा परिसर दणाणून सोडला. सर्व संघटनांनी एकाचवेळी आंदोलन केल्याने विद्यापीठाला छावणीचे स्वरूप प्राप्त झाले होते. या आंदोलनामुळे काही काळ विद्यापीठ परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. मात्र प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवली.
विद्यार्थ्यांनी विशेषतः विद्यापीठाच्या Research and Publication Ethics (RPE) या विभागामार्फत विविध विषयांत पीएचडी करत असलेल्या विद्यार्थ्यांना 2 क्रेडिट कोर्स हा कंपलसरी करण्यात आला आहे. यांसारख्या कोर्समुळे विद्यार्थ्यांवर अतिरिक्त शैक्षणिक व आर्थिक ताण येत असून त्यांच्या संशोधन कार्यावर परिणाम होत असल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच या कोर्ससाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून सुमारे ४००० रुपये फी आकारली जात असल्याचा मुद्दाही आंदोलनात ठळकपणे मांडण्यात आला. ही फी आकारणी अन्यायकारक असून विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा टाकणारी आहे, असा आरोप आंदोलकांनी केला. असे क्रेडिट कोर्स विद्यापीठातर्फे कंपलसरी न करता ऐच्छिक करण्यात यावी ही मुख्य मागणी आज विद्यापीठात झालेल्या विविध राजकीय संघटनांनी व आंदोलकांनी केली.
या कोर्ससाठी प्रत्येक विद्यार्थ्याकडून सुमारे ४००० रुपये फी आकारली जात असल्याचा मुद्दाही आंदोलनात ठळकपणे मांडण्यात आला. ही फी आकारणी अन्यायकारक असून विद्यार्थ्यांवर आर्थिक बोजा टाकणारी आहे, असा आरोप आंदोलकांनी केला.
या आंदोलनात एनएसयुआई, युवा सेना, महाराष्ट्र विद्यार्थी संघर्ष कृती समिती आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांसह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. सर्व संघटनांनी एकमुखाने विद्यापीठ प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.

आंदोलकांनी इशारा दिला की, त्यांच्या मागण्यांवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रशासनाने तातडीने संवाद साधून तोडगा काढावा, अशी मागणीही करण्यात आली.
2 क्रेडिटचा कोर्स काय आहे?
Savitribai Phule Pune University (SPPU) मध्ये ‘Research and Publication Ethics (RPE)’ हा २ क्रेडिटचा कोर्स University Grants Commission (UGC) च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सुरू करण्यात आला आहे. या कोर्सचा उद्देश संशोधनातील प्रामाणिकपणा, प्रकाशनातील नैतिकता आणि Plagiarism सारख्या गैरप्रकारांविषयी जागरूकता निर्माण करणे हा आहे. या कोर्समध्ये विज्ञानाचे तत्त्वज्ञान, संशोधन प्रामाणिकता, प्रकाशन नैतिकता, ओपन ॲक्सेस पब्लिशिंग, संशोधनातील गैरप्रकार आणि डेटाबेस/सायटेशन मेट्रिक्स यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचा समावेश आहे. तो साधारणतः एका महिन्याचा असून लेक्चर्स, असाइनमेंट्स, गटचर्चा आणि सतत मूल्यमापन यावर आधारित आहे.
कोर्स विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा करणे अन्यायकारक तज्ञांचे मत
तथापि, हा कोर्स सर्व पीएच.डी. विद्यार्थ्यांसाठी सक्तीचा करणे अनेक कारणांमुळे योग्य वाटत नाही असे तज्ञांचे मत आहे. पीएच.डी.चे विविध विषय आणि शाखा लक्षात घेतल्यास सर्वांसाठी एकच नैतिकता कोर्स लागू करणे अव्यवहार्य ठरते, कारण प्रत्येक क्षेत्रातील संशोधन आणि प्रकाशन पद्धती वेगवेगळ्या असतात. याशिवाय, संशोधन पद्धती (Research Methodology) आणि अकॅडमिक रायटिंग यांसारख्या विषयांमध्ये आधीच नैतिकतेचे शिक्षण दिले जाते, त्यामुळे RPE कोर्स हा पुनरावृत्ती ठरतो. या कोर्ससाठी आकारली जाणारी सुमारे ₹4000 फी ही आर्थिकदृष्ट्या कमकुवत विद्यार्थ्यांसाठी अतिरिक्त ओझे आहे. तसेच, पीएच.डी. संशोधकांना त्यांच्या मूळ संशोधनासाठी मोठा वेळ द्यावा लागतो, अशा वेळी अतिरिक्त कोर्स लादल्यामुळे त्यांच्या संशोधनाच्या गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो.




