लोहगावसह समाविष्ट गावांचा विकास आराखडा मंजूर करा; आमदार बापूसाहेब पठारे यांची अधिवेशनात मागणी

मुंबई: पुणे महानगरपालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या लोहगावसह इतर गावांचा विकास आराखडा आजतागायत शासनाकडून मंजूर झालेला नाही, ही गंभीर बाब आमदार बापूसाहेब पठारे यांनी पावसाळी अधिवेशनात मांडली. या कारणामुळे स्थानिक विकासाच्या कामांवर मोठा परिणाम होत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नागरिकांच्या मूलभूत गरजा व नियोजनबद्ध शहरविकासासाठी हा विकास आराखडा तातडीने मंजूर होणे आवश्यक आहे अशी स्पष्ट मागणी पठारे यांनी केली.

लोहगावसह समाविष्ट भाग पीएमआरडीएकडून तयार करण्यात आलेल्या आराखाड्याच्या प्रतीक्षेत आहेत. मात्र शासनाकडून तो मंजूर झालेला नसल्यामुळे या गावांमध्ये घरबांधणीच्या परवानग्या रखडल्या आहेत. तसेच, पाणी, ड्रेनेज, रस्ते, उद्याने, शासकीय शाळा-रुग्णालय यांसारख्या मूलभूत सुविधा उभारण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

See also  विद्यापीठात भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा;  भटके विमुक्त हेच खरे भारतीय संस्कृती रक्षक. - शरद माकर