एम.फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नती देऊ तसेच विद्यापीठातील “प्रभारीराज” लवकरच समाप्त करू: उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील

एम.फिल धारक प्राध्यापकांना पदोन्नती देऊ तसेच विद्यापीठातील “प्रभारीराज” लवकरच समाप्त करू  असे आश्वासन उच्च तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिले.

पुणे: महाराष्ट्र राज्याच्या विधिमंडळ अधिवेशनात उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एम.फिल. प्राध्यापकांच्या पदोन्नती आणि नवीन प्राध्यापक पदांच्या भरतीबाबत घोषणा केली आहे. त्यानंतर विद्यापीठ विकास मंचच्या शिष्टमंडळाने मंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन त्यांचे विशेष आभार मानले आणि एम.फिल. प्राध्यापकांच्या पदोन्नती आणि विद्यापीठातील प्रभार राज या विषयांवर सविस्तर चर्चा केली. या चर्चेत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एम.फिल. प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी त्वरित कार्यवाही केली जाईल तशा संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत व सर्व विद्यापीठांमध्ये शिबिरे आयोजित करून पदोन्नती प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण केली जाईल याशिवाय, विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि अधिकारी भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करून प्रभारी राज संपवण्याचे आश्वासनही त्यांनी विद्यापीठ विकास मंचच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहे.

एम.फिल प्राध्यापक पदोन्नती, विद्यापीठातील प्रभारीराज  या सर्व मागण्यांवर सकारात्मक विचार केला जाईल आणि पुढील आठवड्यात मुंबईत सर्व संबंधित अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन या मागण्यांवर चर्चा केली जाईल आणि या मागण्यां संदर्भात जलद निर्णय घेतला जाईल.

ना. चंद्रकांत पाटील, उच्च  व तंत्र शिक्षणमंत्री, महाराष्ट्र राज्य 

या बैठकीला विद्यापीठ विकास मंचाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष एन. डी. पाटील, सचिव परमेश्वर हसबे, राज्य कार्यालय मंत्री राहुल पाखरे, राज्यपाल नियुक्त प्रशासकीय परिषद सदस्य डॉ. गजानन सानप, शिवाजी विद्यापीठ प्रशासकीय परिषद सदस्य एड. स्वागत परुळेकर, प्रशासकीय परिषद सदस्य प्रा. डॉ. संतराम मुंडे, निमंत्रक डॉ. सर्जेराव जिगे, एम.फिल. कृती समितीचे निमंत्रक डॉ. अशोक कोरडे आणि एस. एम. पवार इत्यादी विविध सिनेट सदस्य उपस्थित होते.

युजीसीने १४२१ एमफिल प्राध्यापकांना नेट-सेटमधून सूट दिली आहे आणि त्यांना कायमस्वरूपी नियुक्ती दिली आहे. तथापि, त्यांना कॅस आणि पदोन्नतीच्या सुविधा देखील उपलब्ध करून द्याव्यात, अशी विनंती विद्यापीठ विकास मंचने राज्याचे उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे केली आहे. या संदर्भात लवकरच बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असे आश्वासन मंत्र्यांनी दिले आहे.

परमेश्वर हसबे, सचिव, विद्यापीठ विकास मंच, महाराष्ट्र 

विद्यापीठ अनुदान आयोगामुळे एमफिल प्राध्यापकांचा प्रश्न सुटला आहे. तसेच विद्यापीठात प्रभारी पदाचा मुद्दा आणि विद्यापीठातील कमी होत चाललेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येसाठी अभ्यास समितीची निवड करण्याची मागणी करण्यात आली आहे. चंद्रकांत दादांनी या मुद्द्यांवर सकारात्मकता दर्शविली असून या तीनही मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिले आहे.

-राहुल पाखरे, सिनेट सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

 

विद्यापीठ विकास मंचाच्या विविध मागण्या

  • एम.फिल. प्राध्यापकांच्या पदोन्नतीसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात यावे.
  • विद्यापीठांमध्ये प्राध्यापक आणि अधिकारी भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करावी.
  • विद्यापीठातील प्रभारीराज संपुष्टात आणावे.
  • पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या नावाने अभ्यास केंद्र आणि व्याख्यानमाला सुरू करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा.
  • महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचा अभ्यास करण्यासाठी अभ्यास गटाची स्थापना करावी.
  • राज्य लोकसेवा आयोगामार्फत राज्याच्या उच्च शिक्षण उपसंचालकांची नियुक्ती करण्यात यावी.
See also  महाराष्ट्र-गोवा राज्यस्तरीय पात्रता परीक्षा निकाल घोषित : ६.६९ टक्के विद्यार्थी यशस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!