संशोधनाला चालना देण्यासाठी व संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी ‘पंतप्रधान प्रोफेसरशिप’ कार्यक्रम 

एएनआरएफ तर्फे उदयोन्मुख संस्थांमध्ये संशोधन व संशोधन दर्जा वाढविण्यासाठी पंतप्रधान ‘प्रोफेसरशिप’ कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.

नवी दिल्ली: अनुसंधान राष्ट्रीय अनुसंधान फाउंडेशन (एएनआरएफ) तर्फे शैक्षणिक व रिसर्च संस्थांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी व संशोधनामध्ये नाविन्यता आणण्यासाठ तसेच  शैक्षणिक व संशोधन संस्कृती वाढविण्यासाठी ‘पंतप्रधान प्रोफेसरशिप‘ कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचा उद्देश भारत आणि परदेशातील अनुभवी शास्त्रज्ञांच्या विशेषज्ञतेचा लाभ घेऊन उदयोन्मुख संस्थांमध्ये संशोधन आणि नवप्रवर्तन मजबूत करणे हा आहे.

‘पंतप्रधान प्रोफेसरशिप’ हा कार्यक्रम उदयोन्मुख शैक्षणिक व संशोधन संस्थांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी तसेच संशोधनाचा दर्जा वाढविण्यासाठी, संशोधनाचा पाया मजबूत करुन संशोधन संस्कृती वाढविण्यासाठी आणि नव संशोधकांच्या पुढील पिढीला प्रेरित करण्यासाठी प्रशंसनीय आहे.”

-प्रा. डॉ पराग काळकर, प्र-कुलगुरू,  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ 

प्रमुख कार्यक्रम तपशील

पात्रता: निवृत्त शास्त्रज्ञ, उद्योग व शैक्षणिक क्षेत्रातील प्राध्यापक आणि आंतरराष्ट्रीय वरिष्ठ व्यावसायिक ज्यांच्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यक, कृषी किंवा विज्ञान आणि तंत्रज्ञान संबंधित सामाजिक शास्त्र यामध्ये तज्ञ आहेत.

वय मानक: अर्जदारांचे किमान वय 55 वर्षे आहे, आणि वयाची कोणतीही उच्च मर्यादा नाही.

उत्कृष्टता मानके: अर्जदारांनी उच्च इम्पॅक्ट असलेले प्रकाशन, पेटंट, तंत्रज्ञान हस्तांतरण, फेलोशिप, प्रमुख अनुदान आणि संशोधन आणि नवप्रवर्तन मध्ये मान्यताप्राप्त नेतृत्व याद्वारे उत्कृष्टता दर्शवणे आवश्यक आहे.

प्रदान केलेली मदत

  • फेलोशिप: 30 लाख प्रतिवर्ष
  • संशोधन अनुदान: 24 लाख प्रतिवर्ष + 1 लाख प्रतिवर्ष (निश्चित ओव्हरहेड)

कालावधी:

  • 5 वर्षे

महत्वाच्या तारखा

  • प्रारंभ तारीख: 22 जुलै, 2025
  • अंतिम तारीख: 1 सप्टेंबर, 2025

अर्ज कसा करावा

स्वारस्य असलेले उमेदवारांनी अधिक माहितीसाठी आणि अर्ज करण्यासाठी अधिक खालील लिंक वर जाऊन अर्ज करावा.

https://www.anrfonline.in/ANRF/PMProfessorship_anrf?HomePage=New

See also  प्र -कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची माहिती : विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना व नवीन संस्थेसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे केले आवाहन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!