प्र -कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची माहिती : विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना व नवीन संस्थेसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे केले आवाहन

AICTE ने 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी टेक्निकल संस्था मंजूरीसाठी मागविले अर्ज

प्र -कुलगुरू डॉ. पराग काळकर यांची विशेष माहिती : विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थांना व नवीन संस्थेसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे केले आवाहन

AICTE ने 2026-27 शैक्षणिक वर्षासाठी टेक्निकल संस्था मंजूरीसाठी मागविले अर्ज

२८ नोव्हेंबर २०२५ पासून ऑनलाइन अर्ज स्वीकारले जाणार

नवी दिल्ली : अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषद (AICTE) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मंजूरी प्रक्रियेबाबत महत्त्वाची अधिसूचना जारी केली आहे. देशभरातील नवीन तांत्रिक संस्था सुरू करू इच्छिणाऱ्या संस्था तसेच विद्यमान तांत्रिक संस्था, विद्यापीठे आणि ‘डिस्टन्स’ किंवा ‘ऑनलाइन’ पद्धतीने अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्थांना निश्चित वेळापत्रकानुसार ऑनलाइन अर्ज दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. एआयसीटीईने सर्व उच्च शिक्षण संस्थांना www.aicte.gov.in → Approval Process 2026-27 या विभागात नियमितपणे भेट देऊन अद्यतने, अधिसूचना आणि अन्य माहिती तपासण्याचे आवाहन एआयसीटीई चे सदस्य सचिव,  प्रा. श्यामा रथ यांनी या अधिसूचनेत केले आहे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व संस्थाना व नवीन संस्थेसाठी इच्छुक असणाऱ्यांसाठी अर्ज करण्याचे आवाहन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. पराग काळकर यांनी आवाहन केले आहे.

अर्ज दाखल करण्याची सुरुवात २८ नोव्हेंबर २०२५ पासून

एआयसीटीईच्या अधिकृत वेब पोर्टलवर 28 नोव्हेंबर 2025 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार असून सर्व इच्छुकांनी Approval Process Handbook (APH) 2024-25 ते 2026-27 तसेच वेळोवेळी जारी होणाऱ्या दुरुस्त्या काळजीपूर्वक वाचण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

नवीन तांत्रिक संस्था सुरू करण्यासाठी NSWS प्लॅटफॉर्मवर अर्ज अनिवार्य

नवीन तांत्रिक संस्था सुरू करू इच्छिणाऱ्या संस्थांनी National Single Window System (NSWS) या पोर्टलवरूनच अर्ज करणे आवश्यक आहे.

अभियांत्रिकी, व्यवस्थापन, कॉम्प्युटर अॅप्लिकेशन्स, अॅप्लाइड आर्ट्स अ‍ॅण्ड क्राफ्ट, हॉटेल मॅनेजमेंट, डिझाईन आणि प्लॅनिंग आदी सर्व स्तरांवरील अभ्यासक्रमांसाठी ही प्रक्रिया लागू आहे.

See also  बार्टी तसेच सारथी, महाज्योती, टीआरटीआय व आर्टी या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) वेळापत्रक जाहीर

विद्यापीठांसाठी महत्त्वाचा नियम

केंद्र, राज्य किंवा खाजगी विद्यापीठांनी त्यांच्या सर्व तांत्रिक अभ्यासक्रमांसाठी एआयसीटीई मान्यता घेणे बंधनकारक आहे.

आंशिक मंजूरी मान्य केली जाणार नाही, तसेच चुकीने घेतलेली आंशिक मंजूरी रद्द करण्यात येईल.

‘Institutions Deemed to be Universities’ साठीही 2018-19 पासून एआयसीटीई मान्यता आवश्यक असून ही प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या ३ नोव्हेंबर २०१७ च्या आदेशानुसार आहे.

ODL / ऑनलाइन अभ्यासक्रमांसाठी अर्ज आवश्यक

स्टँडअलोन संस्था किंवा ‘Deemed to be Universities’ जर ऑनलाइन किंवा ओपन अ‍ॅण्ड डिस्टन्स लर्निंग (ODL) पद्धतीने अभ्यासक्रम देत असतील तर त्यांना एपीएचमधील नियमांनुसार अर्ज करावा लागेल.

सविस्तर वेळापत्रक (2026-27)

1. नवीन संस्थांसाठी (शुल्काशिवाय कालावधी)

२८ नोव्हेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६

2. विद्यमान संस्थांसाठी

अभियांत्रिकी, व्यवस्थापन (PG), MCA, अॅप्लाइड आर्ट्स, हॉटेल मॅनेजमेंट, डिझाईन, प्लॅनिंग इ.

२८ नोव्हेंबर २०२५ ते २० डिसेंबर २०२५

3. BBA/BCA/BMS (NPNL Category) साठी

फक्त हेच अभ्यासक्रम चालवणाऱ्या संस्था : १९ डिसेंबर २०२५ ते १२ जानेवारी २०२६

उशीरा शुल्कासह अर्ज

१३ जानेवारी २०२६ ते २० जानेवारी २०६

Related posts:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!