विद्यापीठातील अभाविपचे ‘थाळी बजावो आंदोलनाला‌ यश; विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क परतावा देण्याचे विद्यापीठाचे आश्वासन

विद्यापीठातील अभाविपचे ‘थाळी बजावो आंदोलनाला‌ यश; विद्यार्थ्यांना सरसकट परीक्षा शुल्क परतावा देण्याचे विद्यापीठाचे आश्वासन

पुणे; महाराष्ट्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेप्रमाणेच विद्यार्थी वर्गालाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागले आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील हजारो विद्यार्थी शिक्षणासाठी पुणे व नाशिकसारख्या जिल्ह्यांमध्ये स्थलांतरित झाले आहेत. या विद्यार्थ्यांना अतिवृष्टीचा सर्वाधिक तडाखा बसला असून अनेकांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) यांच्या वतीने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आज ‘थाळी बजावो आंदोलन’ करण्यात आले. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करावे तसेच ज्यांनी परीक्षा शुल्क भरले आहे त्यांना परतावा देण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने अभाविप प्रतिनिधींना लेखी स्वरूपात सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क सरसकट माफ करण्यात येईल असे आश्वासन दिले.

अभाविपचे पुणे महानगर मंत्री राधेय बाहेगव्हानकर यांनी सांगितले की, “विद्यापीठ प्रशासनाने दिलेले आश्वासन लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास अभाविप अधिक तीव्र आंदोलन छेडेल.” या यशस्वी आंदोलनामुळे विद्यार्थ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, विद्यापीठ प्रशासनावर लवकर निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी दबाव वाढला आहे.

See also  राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयांमधील एम.फिल पात्र प्राध्यापकांचा लाभ ; १४२१ एम.फिल पात्र प्राध्यापकांना नेटसेटमधून सूट; उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांची माहिती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!