एनईपी लागु होऊन पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त पुणे विद्यापीठात राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० वर चर्चासत्र
पुणे: राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीला पाच वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य व अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघाचे अध्यक्ष डॉ. धोंडीराम पवार यांच्या अखिल भारतीय राष्ट्रीय शैक्षणिक महासंघ (एबीआरएसएम) आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ (एसपीपीयु) यांच्या संयुक्त विद्यमाने “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० – उपलब्धी, आव्हाने आणि भविष्याचा मार्ग” या विषयावर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. या चर्चासत्रात प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर प्रमुख वक्ते म्हणून सहभागी झाले होते. या चर्चा सत्राचा उद्देश राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० च्या विविध पैलूंवर चर्चा करणे आणि त्याच्या अंमलबजावणीतील आव्हानांना तोंड देण्यासाठी धोरणे आखणे हा होता. डॉ. काळकर म्हणाले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आपल्यासमोर एक नवीन दिशा उघडते, ज्यामध्ये आपल्याला नवीन पिढीला तयार करण्यासाठी नवीन मार्ग शोधावे लागतील. डॉ. काळकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण यशस्वीरित्या अंमलात आणण्यासाठी आपल्याला एकत्र काम करण्याची आवश्यकता आहे. ते म्हणाले की, भविष्यात येणाऱ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी आपल्याला आतापासूनच तयार राहावे लागेल आणि त्यासाठी आपल्याला एक ठोस रणनीती बनवावी लागेल.
मूल्यांवर आधारित शिक्षणाशिवाय शिक्षण अपूर्ण आहे. भारतीय ज्ञान परंपरेतून शिक्षण देऊनच आपण आपल्या समाजाला योग्य दिशा देऊ शकतो.– डॉ. पराग काळकर, प्र-कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
कार्यक्रमातील उपस्थिती
या कार्यक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे ऐव्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. बी. पवार तसेच अधिसभा सदस्य कृष्णा भंडलकर, डॉ. सुभाष केंद्रे, डॉ. प्रगती ठाकूर आणि विविध विभागांचे प्रमुख आणि प्राध्यापक उपस्थित होते. डॉ. हरीश नवले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर डॉ. वैभव जाधव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

आव्हाने अनेक आहेत, पण NEP 2020 आपल्याला संधींचा नवा दरवाजा उघडते; त्या दिशेने एकत्रित पावले उचलणे हाच शिक्षणाचा भविष्यदृष्टीचा मार्ग आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे विद्यार्थ्यांना ज्ञान, कौशल्य आणि संस्कार यांचा संतुलित वारसा देणारे धोरण आहे; आता आव्हानांना उत्तर देत, पुढील वाटचाल ठामपणे करणे “राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 हे केवळ सुधारणा नव्हे, तर शिक्षणक्षेत्रातील परिवर्तनाचा मार्गदर्शक आहे; आव्हानांचा सामना करत पुढील पिढीसाठी गुणवत्तापूर्ण, सर्वसमावेशक आणि जागतिक स्तरावर स्पर्धात्मक शिक्षण घडविणे हीच पुढची दिशा आहे.”-डॉ. डी.बी. पवार, व्यवस्थापन परिषद सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ



















