पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये किडे ; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ ; आरपीआय आठवले गटाचे निवेदन
आरपीआय (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराचे युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड यांची दोषींवर कारवाई करण्याची कुलगुरूंकडे मागणी
पुणे: सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये विद्यार्थ्यांच्या भोजनात किडे आढळून आल्याची धक्कादायक घटना पुन्हा एकदा समोर आली आहे. या घटनेची तक्रार संबंधित विद्यार्थ्याने केल्यानंतर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने कुलगुरूंची भेट घेऊन या घटनेच्या संदर्भात तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. या संदर्भात आरपीआय (आठवले गट) पिंपरी-चिंचवड शहराचे युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड यांनी कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांना एक लिखित निवेदन सादर केले आहे. या निवेदनात दोषींवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
आरपीआयच्या प्रमुख मागण्या
- टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता: टेंडर प्रक्रियेत पारदर्शकता असावी.
- ऑनलाइन टेंडर: सर्व टेंडर ऑनलाइन असावेत.
- वेळ वाढवू नये: टेंडर प्रक्रियेत अनावश्यक वेळ वाढवू नये.
- कठोर कारवाई: जे अधिकारी व्यवस्थापन पदाधिकारी यांच्या मदतीने टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप करतील, त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई व्हावी.
विद्यापीठांच्या रिफेक्टरीमध्ये भोजनाच्या थाळीत किडे आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विद्यार्थ्यांनी यासंदर्भात तक्रार केली असता त्यानंतर आम्ही आरपीआय (आठवले गट) च्या वतीने कुलगुरूंची भेट घेतली असुन कारवाई करण्यासाठी लिखित पत्रव्यवहार केला आहे. तसेच निविदा प्रक्रिया पारदर्शक असावी, सर्व निविदा ऑनलाइन असाव्यात आणि जे अधिकारी टेंडर प्रक्रियेत हस्तक्षेप करतील त्यांच्याविरुद्ध कारवाई व्हावी.
– धम्मरत्न गायकवाड, युवक शहराध्यक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट ) पिंपरी चिंचवड
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ नको
विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी कोणताही खेळ होता कामा नये. जेवणात अळी निघणे अस्वीकार्य असून यावर त्वरित कारवाई व्हावी. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळ सहन केला जाणार नाही. विद्यापीठ प्रशासनाने या प्रकरणाला गांभीर्याने घ्यावे आणि आवश्यक ती पावले उचलावीत. विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेला प्राधान्य द्यावे. जर आमच्या मागण्या पूर्ण केल्या नाहीत तर आम्हाला आंदोलन करावे लागेल,” असे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पिंपरी-चिंचवड शहराचे युवक शहराध्यक्ष धम्मरत्न गायकवाड म्हणाले.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेची जबाबदारी विद्यापीठ प्रशासनाची आहे. आम्हाला वाटते की या प्रकरणात प्रशासनाने त्वरित कारवाई करावी आणि विद्यार्थ्यांच्या स्वास्थ्य व सुरक्षेचे रक्षण करावे.
–कृष्णा भंडलकर, राज्यपाल नियुक्त सदस्य, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

















Leave a Reply