महाराष्ट्र-गोवा राज्यस्तरीय पात्रता परीक्षा निकाल घोषित : ६.६९ टक्के विद्यार्थी यशस्वी

महाराष्ट्र-गोवा राज्यस्तरीय पात्रता परीक्षा निकाल घोषित : ६.६९ टक्के विद्यार्थी यशस्वी

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या सेट परीक्षा विभागामार्फत आयोजित ४० वी राज्यस्तरीय पात्रता (SET) परीक्षेचा निकाल ३० ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेसाठी १,१०,४१२ विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता, त्यापैकी ९०,३६६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. निकालानुसार ६.६९ टक्के म्हणजेच ६,०५० विद्यार्थी परीक्षेत यशस्वी झाले आहेत.

सेट परीक्षेचा विषय निहाय कटऑफ 

 

ही परीक्षा महाराष्ट्र व गोवा राज्यातील १८ शहरांतील २५६ महाविद्यालयांमध्ये १५ जून २०२५ रोजी आयोजित करण्यात आली होती. विद्यार्थी आपला निकाल व प्रमाणपत्र विद्यापीठाच्या अधिकृत संकेतस्थळावरून https://setexam.unipune.ac.in पाहू व डाउनलोड करू शकतात. अशी माहिती डॉ ज्योती भाकरे प्रभारी कुलसचिव व सदस्य सचिव, सेट परीक्षा विभाग यांनी दिली.

निकाल घोषित करण्यात उशीर व कारण 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने १५ जून रोजी घेतलेल्या ४० व्या सेट परीक्षेचा निकाल दोन महिने उलटूनही जाहीर केला नव्हता. यामुळे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पश्चिम महाराष्ट्रतर्फे विद्यापीठाच्या सेट परीक्षा भवनासमोर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनानंतर विद्यापीठ प्रशासनाने ३० ऑगस्टला निकाल जाहीर करण्याचे लेखी आश्वासन दिले होते व ते आश्वासन पूर्ण करून निकाल जाहीर करण्यात आला. उशीर होण्याचे मुख्य कारण म्हणजे विशेषतः “विशेष मागास वर्ग (SBC)” आरक्षणासंदर्भात राज्य सरकारकडून मार्गदर्शन उपलब्ध न होणे, असे सेट विभागातर्फे कारण सांगण्यात आले होते.

See also  फार्मा-केमिकल क्षेत्रात मागासवर्गीय विद्यार्थ्यांना संधी : बार्टीत कौशल्यविकास प्रकल्प यशस्वी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!