सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांच्या पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांचे गुडलक चौकात आमरण उपोषण
पुणे: सन २०२२-२३ नंतर पीएच.डी फेलोशीपची जाहिरात अद्याप प्रसिद्ध झालेली नाही. यामुळे संशोधक विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या पार्श्वभूमीवर सारथी, बार्टी आणि महाज्योती या संस्थांच्या पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांनी गुडलक चौक, पुणे येथे आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, फेलोशीपची जाहिरात न झाल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे संशोधन अर्धवट थांबले आहे. शिष्यवृत्ती व आर्थिक साहाय्य न मिळाल्याने शैक्षणिक कारकीर्द धोक्यात आली आहे. शासनाने तात्काळ फेलोशीपची जाहिरात काढावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा संशोधकांनी दिला आहे. या आंदोलनामुळे गुडलक चौक परिसरात मोठी गर्दी उसळली असून विद्यार्थी संघटनांचेही या उपोषणाला पाठबळ मिळत आहे.














Leave a Reply