IISER रॅगिंग प्रकरण: आयसरमध्ये पीएचडीच्या विद्यार्थ्यावर सुडबुद्धीने एकतर्फी कारवाई करण्यात आली त्यासाठी विद्यार्थ्यांची पीएचडीची डीग्री होल्ड करण्यात आली आहे. या संदर्भात ॲडव्होकेट कौस्तुभ पाटील यांनी उच्च न्यायालयात खटला दाखल करण्यात आला असल्याची माहिती सत्यमेवभारत न्यूजची बोलताना दिली.
मंबई:|पुण्यातील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च (IISER) मध्ये एका विद्यार्थ्यावर रॅगिंगविरोधी नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत एकतर्फी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात संबंधित विद्यार्थ्याने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. प्राध्यापक नागराज बालसुब्रमण्यम यांनी त्यांच्या वैयक्तिक वैमनस्यातून त्याच्यावर कारवाई केल्याचा आरोप उमाशंकर या विद्यार्थ्यांने केला आहे. डीन प्रा. नागराज बालसुब्रमण्यम यांनी यापूर्वी एका विद्यार्थ्याच्या मृत्यूच्या प्रकरणात निष्काळजीपणा दाखवला होता, ज्याचा उमाशंकर याने निषेध केला होता. नंतर या संदर्भात उमाशंकर ने त्यांची माफीही मागितली होती, परंतु तरीही त्याचा राग धरून त्याची पीएचडी पुर्ण होऊन देखील त्याला अद्याप पीएचडी पदवी देण्यात आली नाही. असे उमाशंकर राजपूत याने सत्यमेवभारत न्यूज शी बोलतांना सांगितले.

काय आहे रॅगींग प्रकरण?
डिसेंबर २०२४ मध्ये, आयसर मधील एका क्रीडा स्पर्धेदरम्यान, उमाशंकर राजपूत आणि पूजा वशिष्ठ या दोन विद्यार्थ्यांमध्ये जेवणाच्या व्यवस्थेवरून वाद झाला. जरी प्रकरण तिथेच संपले, तरी पूजाने नंतर उमाशंकर विरुद्ध रॅगिंग विरोधी समितीकडे तक्रार दाखल केली. समितीने उमाशंकर याला दोनदा बोलावले, परंतु त्यांचे ऐकले गेले नाही. त्यानंतर, उमाशंकर याची पीएचडी पदवी ६ महिन्यांसाठी पुढे ढकलण्यात आली.
ही कारवाई एकतर्फी आणि अन्याय्यपुर्ण आहे. IISER च्या अँटी-रॅगिंग समितीने यूजीसीच्या नियमांचे पालन केले नाही आणि या प्रकरणात सुडबुद्धीने कारवाई करण्यात आली आहे. आम्ही या प्रकरणाची तक्रार यूजीसीकडेही करू आणि न्यायाची मागणी करू. पदवी न मिळाल्यामुळे उमाशंकर यांच्या नोकरीच्या संधींवर परिणाम झाला आहे.
– कौस्तुभ पाटील, वकील, उच्च न्यायालय, मुंबई
“मला चुकीच्या पद्धतीने रॅगिंगचा दोषी ठरवले गेले, तर तक्रारदारच वास्तविक गुन्हेगार होता. मी प्रकरणात न्यायाची मागणी करतो आणि यात सहभागी असलेल्या लोकांविरुद्ध योग्य कारवाईची अपेक्षा करतो. या प्रकरणानंतर, मी संस्थेच्या आतल्या हुकूमशाही पद्धती आणि गैरवर्तनाबद्दल अधिक माहिती देईन.”
–उमाशंकर राजपूत, पीएचडी स्टुडंट्स, आयसर इन्स्टिट्यूट पुणे
उच्च न्यायालयात केस दाखल करण्यात आली आहे. या संदर्भात मला माहिती नाही मी यासंदर्भात बोलायला ऑथराईज पर्सन नाही.
– प्रा. नागराज बाला सुब्रमण्यम, डीन, आयसर इन्स्टिट्यूट, पुणे




