गुरु पौर्णिमा विशेष: डॉ. पराग काळकर उवाच; गुरूंच्या प्रति आदर आणि कृतज्ञतेचा सण

गुरु पौर्णिमा: गुरूंच्या प्रति आदर आणि कृतज्ञतेचा सण

गुरु पौर्णिमा हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे, जो गुरूंच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हा सण आषाढ महिन्याच्या पौर्णिमा तिथीला साजरा केला जातो, जो सामान्यत: जुलै किंवा ऑगस्ट महिन्यात येतो.गुरु पौर्णिमा हा एक महत्त्वाचा सण आहे, जो गुरूंच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरा केला जातो. हा सण आपल्याला गुरूंचे महत्त्व समजून घेण्याची आणि त्यांच्या प्रति नमन करण्याची संधी प्रदान करतो.

गुरु पौर्णिमेचे महत्त्व काय?

  •  गुरूंच्या प्रति आदर आणि कृतज्ञता व्यक्त करणे
  • -ज्ञान आणि बुद्धिमत्तेचे महत्त्व समजून घेणे
  • -गुरूंच्या प्रति नमन आणि पूजा करणे
  • -आध्यात्मिक ज्ञान आणि आत्म-साक्षात्काराच्या प्राप्तीसाठी गुरूंची भूमिका समजून घेणे

गुरु पौर्णिमा कशी साजरी केली जाते?

गुरु पौर्णिमा साजरी करण्यासाठी खालील पद्धतींचा अवलंब केला जातो:

  • गुरूंची पूजा आणि नमन करणे
  • गुरूंना भेटवस्तू देणे
  • -आध्यात्मिक ज्ञान आणि आत्म-साक्षात्काराच्या प्राप्तीसाठी ध्यान आणि जप करणे
  • -गुरूंसोबत वेळ घालवणे आणि त्यांच्या अनुभवांमधून शिकणे

 

डॉ. पराग काळकर उवाच… 

सूचकश्वैव वाचको दर्शकस्तथा । शिक्षको बोधकश्चैव षडेते गुरवः स्मृताः ॥

आज गुरुपौर्णिमा, माझ्या जीवनाला घडवून, सद्विचारांचे कोंदण देणाऱ्या सर्व सदगुरुंच्या संस्मरणाचा क्षण.

ज्ञानेश्वर माउलींच्या शब्दांमध्ये…

सदगुरु सारिखा असता I पाठीराखा इतरांचा लेखा कोण करी II ज्ञानदेव म्हणे तरलो तरलो I आता उद्धरलो गुरु कृपे II

माझ्या जीवनाला आकार देऊन माझ्या सद्गुणांचा विकास घडवून ज्या परमचैतन्याने माझे आयुष्य सुखदुःखरूपी द्वंद्वाच्या लाटेवरून तरून जाण्याचे संस्कार करून मला कळत नकळत घडवलं, त्या परमचैतन्य आनंदमयी गुरुतत्त्वास माझे साष्टांग नमन.

समर्थ रामदासांच्या शब्दात…

“जैसें नेत्रीं घालितां अंजन । पडे दृष्टीस निधान । तैसें सद्गुरुवचनें ज्ञान । प्रकाश होये ॥ ३८॥

माझ्या अंतर्मनाला साद घालणाऱ्या “सदगुरुंना” मी विश्वास देऊ इच्छितो गुरुने दिला ज्ञानरूपी वसा आम्ही चालवू हा पुढे वारसा. कोरोनापश्चात आणि त्यानिमित्ताने निर्माण झालेल्या अनेकविध संकटांच्या काळात सदगुरुंच्या सकारात्मक ऊर्जेचं वलय मला निश्चितच पुढील वाटचाल करण्यास मदत करणार आहे. आज प्रत्येकाने आपल्या जीवनप्रवासात भेटलेल्या सर्व सद्गगुरुतत्वाचे स्मरण केल्यास

जगतगुरु तुकाराम महाराजांच्या वचनाप्रमाणे…

“आनंदाचे डोही आनंद तरंग I आनंदचि अंग आनंदाचें।।”

अशी स्थिती माझ्या जीवनामधे अनुभवता येईल. त्या परम सदगुरुचरणी या निमित्ताने एवढंच मागणं आहे.

ग.दि.माडगूळकर यांच्या शब्दात…

“परम सदगुरु परमार्थाप्रत न्यावी माझी मती ….. विहित कर्म मी नित्य करावे आंस नसो चित्ती ….. स्वाध्यायाने उमजावी मज माझ्यामधली शक्ती”

आपल्या प्रत्येकाच्या जीवनात उपस्थित असलेल्या या “गुरु” तत्वाला माझा नमस्कार…

(……..लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)

See also  दहीहंडीच्या निमित्ताने: दहीहंडी म्हणजे समाजातील स्तर; समाजातील प्रत्येक स्तर महत्वाचा- डॉ. पराग काळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!