यंदाच्या ओल्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आहेत. त्यांच्या संकटात त्यांना मदत करणे, हेच खरे लक्ष्मीपूजन आहे. डॉ. पराग काळकर
लक्ष्मी म्हणजे संपत्ती आणि समृद्धीचे प्रतीक. आज लक्ष्मीपूजनाच्या मंगलदिनी आपल्या घरात असलेल्या अष्टलक्ष्मींचे (पैसा, अडका, सोनें-नाणे) घरोघरी पूजन केले जाते. आपल्या आयुष्यात येणारी लक्ष्मी अनेक रूपांमध्ये अवतरत असते. जसे की, “अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम्” या श्लोकानुसार, आपल्या घरातील लक्ष्मीने वाजत गाजत आणि मांगल्याने प्रवेश करावा. तसेच, “अलक्ष्मीं नाशयाम्यहम्” यानुसार, चुकीच्या मार्गाने, माध्यमातून आलेल्या संपत्तीचा (अलक्ष्मीचा) नाश व्हावा.
• आरोग्यलक्ष्मी: कोरोनानंतर आणि आजपर्यंत आमच्या सर्वांच्या आरोग्याचे जतन व रक्षण करणाऱ्या आरोग्यलक्ष्मीचा जागर करणे अत्यावश्यक आहे.
• विद्यालक्ष्मी: ज्ञानाधिष्ठित समाजाच्या निर्मितीसाठी आणि अधिक सुसंस्कृत होण्यासाठी, सरस्वतीच्या रूपातील विद्यालक्ष्मीचे स्मरण करणे महत्त्वाचे आहे.
आणि या मंगलदिनी, आपण सर्वांनी विशेषत्वाने धान्यलक्ष्मीच्या महत्त्वाचे स्मरण करूया:

धान्यलक्ष्मी आणि शेतकरी बांधव:
आमच्या ऊर्जेचा स्रोत असलेल्या धान्यलक्ष्मीचे महत्त्व ओळखून, तिच्या निमित्ताने काबाडकष्ट करणाऱ्या आपल्या शेतकरी बांधवांबद्दलची कृतज्ञता सदैव जपली पाहिजे.
यंदाच्या ओल्या दुष्काळामुळे अनेक शेतकरी बांधव मोठ्या अडचणीत आहेत. त्यांच्या संकटात त्यांना मदत करणे, हेच खरे लक्ष्मीपूजन आहे. या दिवाळीच्या प्रकाशात, आपण सर्वजण त्यांच्या मदतीसाठी यथाशक्ती पुढे येऊया आणि आपल्या अन्नदात्याप्रती सामाजिक बांधिलकी जपूया.
आदिलक्ष्मी, धनलक्ष्मी, विद्यालक्ष्मी, धान्यलक्ष्मी, धैर्यलक्ष्मी, संतानलक्ष्मी, विजयलक्ष्मी, राजलक्ष्मी, कार्यलक्ष्मी आणि या सर्वांचे चालते-बोलते रूप, घराला ‘घरपण’ देणारी गृहलक्ष्मी – या प्रत्येक लक्ष्मीचे आपल्या जीवनातील स्थान सदैव अबाधित राहो. सर्वांना लक्ष्मीपूजनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा!
(लेखक डॉ पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)

















Leave a Reply