दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा: आनंदाचा हा नंदादीप केवळ आपल्या हृदयातच नव्हे, तर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक नात्यात सदैव तेवत राहो…
“करंजीचा गोडवा, शंकरपाळ्यांचा खुसखुशीतपणा, चकलीची धार, लाडवाचा स्नेहबंध आणि दिव्याचा प्रकाश… या सणाचे प्रत्येक रूप आपल्या जीवनात आनंद, समृद्धी आणि तेज घेऊन येवो.”

• एक करंजी: तुमच्या जीवनात आनंदोत्सव घेऊन येवो.
• एक शंकरपाळे : चौकस आणि सकारात्मक विचारांची साथ देवो.
• एक चकली: तुमच्या यशाची कीर्ती सर्वदूर विस्तारो.
• एक लाडू: कुटुंबाचे ऐक्य आणि प्रेम अधिक घट्ट करो.
• एक मिठाई: मनात सदैव गोडवा आणि मांगल्य टिकवून ठेवो.
• एक दिवा: अज्ञानाचा अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा ठरो.
• एक रांगोळी: जीवनात उत्साहाचे आणि समाधानाचे रंग भरो.
• एक आकाशकंदील: तुमच्या आकांक्षांना यशाची उत्तुंग भरारी मिळो.
• एक उटणे: तुमचे जीवन सुगंधी आणि तेजस्वी बनवो.
• हा सण: जीवनात आनंद, समतोल आणि उत्साह राखणारा ठरो.
अन् एक मी: तुम्हाला भरभरून शुभेच्छा देणारा…
“आनंदाचा हा नंदादीप केवळ आपल्या हृदयातच नव्हे, तर आपल्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यात आणि प्रत्येक नात्यात सदैव तेवत राहो.”
तुम्हाला आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबाला:
जे जे मंगलमय आहे, जे जे कल्याणकारी आहे, जे जे सर्वोत्तम आहे, जे जे ऐश्वर्यसंपन्न आहे, ते सर्व तुमच्या जीवनात भरभरून येवो! हीच मनोभावे प्रार्थना.
||● शुभ दिपावली ●||
(लेखक डॉ. पराग काळकर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)


















Leave a Reply