उठ सुठ आंदोलनामुळे विद्यापीठाची प्रतिमा खराब; आंदोलनांचा परिणाम ॲडमिशनवर ; विद्यापीठाचे रँकिंग प्राध्यापकांच्या कमतरतेमुळे घसरतेय –-मंत्री चंद्रकांत पाटील
पुणे :सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या १२६ व्या दीक्षान्त समारंभात उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विद्यापीठासमोरील आव्हानांवर भाष्य केले. त्यांनी सांगितले की, विद्यापीठाची क्रमवारी घसरण्यामागचे प्रमुख कारण म्हणजे प्राध्यापकांची कमतरता असून, लवकरच प्राध्यापक भरती प्रक्रिया मार्गी लागेल तसेच पाटील म्हणाले की, पुणे विद्यापीठाची आंतरराष्ट्रीय स्तरावर चांगली प्रतिमा असून, ती अधिक बळकट करण्यासाठी शैक्षणिक गुणवत्तेत सातत्याने वाढ होणे आवश्यक आहे. विद्यार्थी प्रश्नांवर वारंवार आंदोलन केल्यास विद्यापीठाची प्रतिमा खराब होऊन इतर राज्यांतील व परदेशी विद्यार्थी येथे शिकायला येणार नाहीत. त्यामुळे आंदोलनांना विरोध नसला तरी ते रचनात्मक पद्धतीने व्हावेत, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.
“विद्यार्थ्यांच्या समस्या आंदोलनातून पुढे येतात. पण प्रश्न समन्वयाने सोडवता येतात. विद्यापीठ प्रशासनाने समाजाच्या मनातील प्रश्न ओळखून त्यावर उपाययोजना करणे आवश्यक आहे,” असे ते म्हणाले.
सामाजिक माध्यमांवर विद्यापीठाची रँकिंग वाढली की कौतुक केले जाते, तर घटली की निंदा केली जाते. त्यामुळे या क्षेत्रात सातत्याने सकारात्मक प्रयत्न होणे गरजेचे असल्याचे पाटील यांनी ठामपणे सांगितले.

















Leave a Reply