सुमित ढोरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) सदस्य म्हणून निवड

सुमित ढोरे यांची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) निवड

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेसाठी (सिनेट) नवीन सदस्यांची नामनिर्देशने करण्यात आली आहेत. महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम २८(२)(फ) [28(2)(v)] नुसार संबंधित तरतुदीनुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.प्रभारी कुलसचिव प्रा. (डॉ.) ज्योती भाकरे यांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक प्रसिद्ध करण्यात आले.

सदर अधिसभेत विद्यापीठाच्या विविध कार्यक्षेत्रांमध्ये अनुभव असलेल्या व्यक्तींना ‘सदस्य’ म्हणून नामनिर्देशित करण्यात आले आहे. त्यानुसार सुमित ढोरे, कनिष्ठ सहाय्यक (सर्वसाधारण), परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांची अधिसभेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.

विद्यापीठ प्रशासनाने त्यांच्या या नियुक्तीसाठी अभिनंदन केले असून, अधिसभेतील त्यांचे कार्यकाल महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६, कलम ६३ आणि ६४ मधील तरतुदीनुसार राहील. तथापि, या संदर्भातील अंतिम आदेश महाराष्ट्र शासनाकडून होणाऱ्या निर्णयावर अवलंबून राहतील, असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

Related posts:

See also  सारथी, बार्टी आणि महाज्योतीच्या पीएच.डी संशोधक विद्यार्थ्यांचे गुडलक चौकात आमरण उपोषण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!