बार्टीसमोर झळकला वंचित बहुजन आघाडीचा बॅनर; विद्यार्थ्यांच्या अधिछात्रवृत्तीबाबत सरकारकडे केली मागणी
पुणे:संशोधन विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अधिछात्रवृत्ती (फेलोशिप) बाबतची जाहिरात अद्याप प्रसिद्ध न झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. अनेक वर्षांपासून अधिछात्रवृत्ती जाहीर होण्यात झालेल्या विलंबामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आले असून, शिक्षणापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. या प्रकाराला वाचा फोडण्यासाठी पुणे शहर वंचित बहुजन आघाडीतर्फे बार्टीसमोर एक लक्षवेधी बॅनर लावण्यात आला असुन लवकर नवीन जाहिरात प्रसिद्ध करून विद्यार्थ्यांच्या अधिवृछात्रत्तीबाबत सरकारकडे मागणी केली आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या गांभीर्याने घेऊन सरकारने तत्काळ निर्णय करावा, अन्यथा याविरोधात मोठा आंदोलनात्मक पवित्रा घेण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी या संदर्भात सरकारवर टीका केली आहे. “सरकारसने समान निकालाच्या नावाखाली विद्यार्थ्यांची फेलोशिप रोखू नये. संशोधन विद्यार्थ्यांची जाहिरात तातडीने प्रसिद्ध करून त्यांना न्याय द्यावा,” अशी मागणी त्यांनी केली.
समान धोरण नावाखाली शासन बहुजन विद्यार्थ्यांवर फेलोशिपची जाहिरात न काढुन अन्याय करत आहेत. २०२१ ते २०२४ या तीन वर्षांपासून बार्टीने जाहिरात काढलेली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने हा फलक लावला आहे. कारण विद्यार्थ्यांना फक्त वंचित बहुजन आघाडीच न्याय देऊ शकते. जर बार्टी ने या संदर्भात लवकर निर्णय घेतला नाही तर बार्टी समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.
–ऍड. अरविंद तायडे, पुणे शहराध्यक्ष, वंचित बहुजन आघाडी
समान धोरणा हे अनुच्छेद ४६ चे उल्लंघन करणारे आहे. त्यामुळे राज्य सरकारने समाधान धोरणाचा जीआर तात्काळ रद्द करावा. आणि फेलोशीफ संबंधित नियमितपणे जाहिरात प्रसिद्ध करावी. म्हणजे विद्यार्थीचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. दरवर्षी राज्य सरकार प्रत्येक नवीन बॅचला आंदोलन , मोर्चा करण्यासाठी भाग पाडते. असे न होता एकच धोरणात्मक निर्णय घेऊन हा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढला पाहिजे. यासंबंधी मा. बाळासाहेब आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा करत राहू.
-राहुल ससाणे, आंबेडकरी विद्यार्थी कार्यकर्त

















Leave a Reply