बार्टी तसेच सारथी, महाज्योती, टीआरटीआय व आर्टी या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षणासाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) वेळापत्रक जाहीर
पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे तर्फे तसेच सारथी, महाज्योती, टीआरटीआय व आर्टी या संस्थांच्या माध्यमातून सन 2025-26 करिता राबविण्यात येणाऱ्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांसाठी सामायिक प्रवेश परीक्षा (CET) घेण्यात येणार आहे.
ही परीक्षा 14 सप्टेंबर 2025 ते 27 सप्टेंबर 2025 या कालावधीत होणार असून UPSC, MPSC, बँकिंग, विमा, SSC, पोलिस, लष्करी तसेच इतर विविध स्पर्धा परीक्षांसाठीचे पूर्व प्रशिक्षण मिळविण्यासाठी उमेदवारांची निवड या प्रवेश परीक्षेतून केली जाणार आहे.
वेळापत्रक ठळक मुद्दे
14 व 15 सप्टेंबर: UPSC नागरी सेवा पूर्व प्रशिक्षण योजना
16 सप्टेंबर: IBPS, SBI, RBI, NABARD, LIC व अन्य बँकिंग-विमा परीक्षा
17 ते 20 सप्टेंबर: MPSC राज्यसेवा व अभियांत्रिकी सेवा परीक्षा
20 ते 23 सप्टेंबर: MPSC गट-ब, गट-क व इतर वर्ग ३ सेवा परीक्षा
24 व 25 सप्टेंबर: SSC स्पर्धा परीक्षा
25 ते 27 सप्टेंबर: पोलिस, लष्करी व अर्धसैनिक दल प्रशिक्षण कार्यक्रम
27 सप्टेंबर: MPSC न्यायिक दंडाधिकारी (JMFC) परीक्षा
उमेदवारांसाठी सूचना
प्रत्येक परीक्षेसाठी स्वतंत्र प्रवेशपत्र (Admit Card) ऑनलाइन डाउनलोड करणे अनिवार्य आहे.
प्रवेशपत्र दोन टप्प्यांत उपलब्ध होणार:
टप्पा 1: शहराचे वाटप – परीक्षा ६ दिवस आधी
टप्पा 2: अंतिम परीक्षा केंद्र – परीक्षा ३ दिवस आधी
उमेदवारांना ३ दिवस आधी Mock Test पोर्टलवर उपलब्ध करून दिला जाईल.
प्रवेशपत्राशिवाय कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांना केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही.
उमेदवारांना प्रवेशपत्र किंवा तांत्रिक अडचणींविषयी मार्गदर्शनासाठी संबंधित संस्थांचे हेल्पलाइन क्रमांक तसेच cethelpdesk2025@gmail.com हा ईमेल उपलब्ध करून देण्यात आला आहे. सर्व उमेदवारांना आगामी परीक्षांसाठी हार्दिक शुभेच्छा”,
– सुनील वारे,महासंचालक, बार्टी
















Leave a Reply