पुण्यात भाजप युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात

पुण्यात भाजप युवा मोर्चा जिल्हा कार्यकारिणीची बैठक उत्साहात पार पडली असुन या जिल्हा पातळीवर पक्ष मजबूत करण्यावर चर्चा करण्यात आली असून या बैठकीत कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आवाहन करण्यात आले.

पुणे: भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा पुणे जिल्हा कार्यकारिणीची बैठक पुण्यात पक्ष कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाली. ही बैठक नुकतेच निवडून आलेले जिल्हा अध्यक्ष वैभव सोलणकर यांच्या प्रमुख उपस्थित पार पडली.  या बैठकीस मंडळ अध्यक्ष, जुने-नवे पदाधिकारी तसेच इंदापूर, बारामती, पुरंदर, भोर, राजगड, मुळशी, खडकवासला आणि दौंड तालुके येथील मंडळ अध्यक्ष व जिल्हा कार्यकारिणी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. सोलणकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे स्वागत करून आगामी काळात प्रत्येक तालुक्यात युवा मोर्च्याच्या शाखा सुरू करण्याबाबत सविस्तर चर्चा केली.

आपण कार्याची सुरुवात अत्यंत छोट्या स्तरावर केली होती, परंतु आज संघटनशक्ती अनेक पटींनी वाढली आहे. आता आपल्याला अधिक सक्षम संघटन घडवायचे आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी नेतृत्व क्षमता, संघटन कौशल्य आणि तत्परता वाढवणे आवश्यक आहे.

वैभव सोलणकर, जिल्हा अध्यक्ष, भाजयु, पुणे जिल्हा 

बैठकीत जिल्हा कार्यकारिणी सदस्यांनी नवमतदार नोंदणी, युवकांचे सभासद नोंदणी अभियान, तालुका कार्यकारिणी रचना तसेच प्रदेश युवा मोर्चा राबवित असलेले कार्यक्रम बूथ स्तरावर कसे पोहोचवता येतील यावर मार्गदर्शन केले.

जिल्हा पदाधिकारी अमर बुदगुडे यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारी योजना समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी युवा मोर्चा समर्थपणे निभावेल. तर अनिकेत ढमाले यांनी कार्यकर्त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार-प्रसारावर अधिक भर देण्याचे आवाहन केले.

बैठकीचा समारोप करताना सोलणकर यांनी सर्व कार्यकर्त्यांचे आभार मानले व जिल्ह्यातील प्रत्येक युवक कार्यकर्ता पक्षाचे शक्तिकेंद्र बनेल, असा विश्वास व्यक्त केला.

See also  दहीहंडीच्या निमित्ताने: दहीहंडी म्हणजे समाजातील स्तर; समाजातील प्रत्येक स्तर महत्वाचा- डॉ. पराग काळकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!