शिक्षक दिन विशेष : संपादकीय
भारतामध्ये दरवर्षी ५ सप्टेंबर हा दिवस डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ‘शिक्षक दिन’ म्हणून साजरा केला जातो. आपल्या जीवनात शिक्षकांचे योगदान अमूल्य आहे. ते केवळ ज्ञान देत नाहीत, तर आपल्या व्यक्तिमत्वाला आकार देतात. आपल्यातील सुप्त गुणांना ओळखून त्यांना योग्य दिशा देतात आणि आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. अपयशाच्या काळात आपला हात धरून आपल्याला योग्य मार्ग दाखवतात. ते आपल्याला आत्मविश्वास देतात आणि आपल्यातील बाळबोध, अल्लडपणाला समजून घेतात. आपली आर्थिक, सामाजिक स्थिती न पाहता, ते आपल्याला एक चांगला विद्यार्थी म्हणून घडवतात.

शिक्षक आपल्याला स्वावलंबी बनवतात आणि आपली अतिरिक्त ऊर्जा चांगल्या कामांकडे वळवतात. चुकल्यावर प्रेमानी रागावतात आणि पुन्हा मायेने पाठीवर हात ठेवतात. स्वतःच्या भविष्याचा विचार न करता, ते विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी झटतात. ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे, ते स्वतः आदर्श निर्माण करतात. पदवी आणि सन्मानापेक्षा, त्यांच्या विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या कौतुकाची थाप महत्त्वाची असते.
आपले शिक्षक स्वतःचे सुख-दुःख बाजूला ठेवून आपल्यासाठी झटतात. अडचणीच्या काळातही ते आपल्या शैक्षणिक प्रगतीसाठी प्रयत्न करतात. त्यांचे आशीर्वाद आणि पाठीवरची थाप आपल्याला प्रत्येक लढ्यात ऊर्जा देते.

अशा सर्व महान शिक्षकांना वंदन! त्यांचे आशीर्वाद, प्रेम आणि आस्था हीच आपल्या जीवनाची खरी ऊर्जा आहे. अशा सर्व ज्ञानी शिक्षकांचे जीवन आनंद आणि समाधानाने भरलेले राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

















Leave a Reply