विद्यापीठात भटके विमुक्त दिन उत्साहात साजरा; भटके विमुक्त हेच खरे भारतीय संस्कृती रक्षक. – शरद माकर
पुणे: महाराष्ट्र शासनाने घोषित केलेला 31 ऑगस्ट भटक्या विमुक्त दिनानिमित्त शरदजी माकर बोलत होते. भटके विमुक्त जमाती ह्या मूळच्या भारतीय संस्कृती रक्षक व संवर्धन करण्याचे काम पिढ्यानपिढ्या करत आले आहेत. परकीय आक्रमण मोगल, ब्रिटिश आणि मुस्लिम, ख्रिस्ती धर्म प्रसार, प्रचार करण्यासाठीच भारतावर आक्रमण केले आहेत पण हिंदू धर्म व आपली सनातन परंपरा टिकवण्यासाठी भटके विमुक्त जाती जमातींनी अवहेलनाचे जीवन स्वीकारून भारतीय संस्कृतीचे संरक्षण केले आहे. अडीचशे पेक्षा जास्त भटक्या विमुक्त जाती या आज संघर्षमय जीवन जगत आहेत परंतु आजपर्यंतच्या शासकांनी त्यांच्याकडे लक्ष ही दिले नाही,
स्वातंत्र्य उलटून 75 वर्ष नंतरही भटक्या विमुक्त जातीकडे पहायला कोणी तयार नाही. अडीचशे पेक्षा जास्त जाती असूनही मूलभूत गरजा सुद्धा पूर्ण झालेले नाहीत अशी खंतही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्र शासनाने भटक्या विमुक्त दिन साजरा करण्यासाठी स्वतंत्र जीआर काढल्याबद्दल त्यांनी शासनाचे आभार मानले.
यावेळी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ सुरेश गोसावी उपस्थित होते त्यांनी सुद्धा मी गोसावी समाजाचे प्रतिनिधित्व करतो व मला संघर्ष करूनच आज इथपर्यंत पोहोचता आले याबद्दल आलेले अनुभव सांगितले.
प्रा. दूधभाते यांनी सूत्रसंचालन केले तर प्रा. डॉ. डी. बी. पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला विद्यापीठ सिनेट सदस्य कृष्णाजी भंडलकर, शंतनु लामधाडे, प्रसेनजीत फडणवीस, डॉ. राजेंद्र घोडे विद्यापीठाचे आंतरविदद्या शाखेचे अधिष्ठाता डॉ. प्रा. संजय तांबट उपस्थित होते. आभार प्रदर्शन डॉ . प्रा.गीता शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे आयोजन शिक्षण शास्त्र प्रशाला प्राध्यापक डॉ विलास आढाव, बहिशाल शिक्षण मंडळ व ज्येष्ठ नागरिक सहाय्यता कक्ष चे प्रा डॉ हरिश्चंद्र नवले आणि विद्यापीठ कट्टा यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी पुढील मान्यवर उपस्थित होते डॉक्टर गणेश ढवळे, प्रा पोपट शिंदे, शुभांगी तांबट, हेमंत जी हरहरे, स्वामी धनगर, सुभाष पवार, एस ओ डी एल चे संचालक डॉ वैभव जाधव, एम एम टी टी सी चे संचालक प्रा डॉ सुभाष केंद्रे, डॉ संजय कोळेकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे अध्यासनाचे अध्यक्ष डॉ भणगे, डॉ मनोहर सानप, लेफ्ट. आशिष सांगळे तसेच अनेक सामाजिक क्षेत्रांतील कार्यकर्ते, विद्यार्थी विद्यार्थिनी व अभ्यासक या प्रसंगी उपस्थित होते.


















Leave a Reply