सारथीचा सारथी कोण? सारथीचा कारभार विना ‘सारथी’ ; सारथीला व्यवस्थापकीय संचालकच मिळेना

सारथीचा सारथी कोण? सारथीचा कारभार विना ‘सारथी’ सारथीला दिड महिन्यांपासून व्यवस्थापकीय संचालकच मिळेना

पुणे: छत्रपती शाहू महाराज प्रशिक्षण, संशोधन व मानव विकास संस्था (सारथी) ही शासनाची एक स्वायत्त संस्था असून तीच्यामार्फत अनेक महत्त्वाच्या योजना राबविल्या जातात. या योजनांना गती देण्याचे काम व्यवस्थापकीय संचालक करतात. सध्या या संस्थेच्या कार्यपद्धतीबाबत विविध आरोप-प्रत्यारोप सुरू असताना, गेल्या दीड महिन्यापासून ही संवेदनशील संस्था संचालकविना कार्यरत आहे. त्यामुळे सारथीचा सारथी कोण अशी म्हणण्याची वेळ आली आहे. एकीकडे कार्यक्षम उपमुख्यमंत्री अजित पवार या विभागाचे पालकमंत्री आहेत आणि सारथीला “निधी कमी पडू देणार नाही” अशी त्यांनी घोषणा केली आहे परंतु प्रत्यक्षात मात्र दीड महिन्यांपासून सारथीच्या संचालकाची नियुक्ती न झाल्यामुळे सर्व योजनांची अंमलबजावणी ठप्प झाली आहे.

विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचा सुर 

सारथीच्या विद्यार्थ्यांमध्ये यामुळे नाराजीचा सूर आहे. कारण आजतागायत देशांतर्गत शिष्यवृत्तीची जाहिरात जाहीर झालेली नाही, चालू शैक्षणिक वर्षातील परदेशी शिष्यवृत्ती योजनेतील पात्र विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध झालेली नाही, अजुनही जेईई/नीट कोचिंग सुरू झालेले नाहीत.तसेच पोलीस भरतीचे मार्गदर्शन वर्ग सुद्धा सुरू झालेले नाहीत. अशा अनेक योजनांची अंमलबजावणी रखडली आहे. या बाबत तक्रार करायची तरी कुणाकडे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 

राज्य सरकारने सारथी, बार्टी, टीआरटीआय, महाज्योती, आर्टी आणि अमृत या स्वायत्त संस्थांसाठी समान व सर्वसमावेशक धोरण लागू केले असताना केवळ सारथी मात्र या योजनांच्या अंमलबजावणीत उदासीन आहे, ही खेदाची बाब आहे.

-अँड. कुलदीप आंबेकर, अध्यक्ष, स्टुडंट हेल्पिंग हँडस

See also  मंत्री भुजबळ विधान सभेत गरजले; आणि ओबीसी मुलामुलींच्या वसतीगृह बांधकामासाठी १० जिल्ह्यात मिळाल्या शासकीय जागा लवकरच शासनाची ओबीसींची भव्य वसतीगृहे साकारणार!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!